पार - एक भयकथा - 1

(20)
  • 84.3k
  • 2
  • 66.3k

पार - एक भयकथा भाग १ दुपारचे चार वाजायला आले होते. सामानाने खचाखच भरलेली तवेरा आणि पॅगो आता जवळ-जवळ मोकळी झाली होती.चार कामगारांच्या मदतीने अरविंदने सगळं सामान घरात ठेवलं.मोकळ्या रानात एकाला एक लागून जेमतेम चार कौलारू घरे होती. त्यातल्या एका घरात थोड्यादिवसा साठी अरविंदचे कुटुंब शिफ्ट झाले होते. मनीषाने सगळ्यात आधी गॅस आणि आणलेली सिंगल शेगडी लाऊन घेतली.“साहेब येतो आम्ही” सामान आत लाऊन झाल्यावर कामगार बोलले.“थांबा चहा टाकलाय तेवढा घेऊन जा ” मनीषा बोलली.तिच्या आपुलकीने त्यांना खूप बरे वाटले. ध्रुव आणि आर्या अंगणात पकडापकडी खेळत होते. शहरातल्या मुलांना मोकळ्या मैदानात वावरताना पंख फुटल्या प्रमाणे वाटत होते. मालती मावशी मनीषाला मदत