एका सस्पेन्सची कॉमेडी... एका एकांकिका स्पर्धेसाठी आमच्या गृपने एक रहस्यकथेवर बेतलेली एकांकिका बसवायची ठरवली.राज्य पातळीवर होणाऱ्या या स्पर्धेत भाग घ्यायची खूप दिवसाची आमच्या हौशी नाट्य संस्थेची इच्छा या निमित्ताने प्रत्यक्षात येणार होती. साधारणपणे एखादी नामवंत लेखकाने लिहिलेली एकांकिका निवडून ती स्पर्धेसाठी बसवावी असे सगळयांचे मत होते;पण आमच्या ग्रुपमधल्या एका स्वतःला अष्टपैलू कलाकार समजणाऱ्या एका मित्राचे मत वेगळे होते.हा आमच्या ग्रुपचा लीडर होता. या हौशी मित्रामुळेच आमची ही नाट्य संस्था टिकून होती त्यामुळे अर्थातच तो म्हणेल ती पूर्व दिशा असायची.तर या मित्राने नुकतीच एक एकांकिका लिहिली होती आणि त्याचे म्हणणे होते की आपण दुसऱ्या कुणाची संहिता घेण्याऐवजी त्याची नवी कोरी