ती एक शापिता! - 22

(13)
  • 5.9k
  • 2.6k

ती एक शापिता! (२२) पीयूष लगबगीने अशोकच्या घराकडे निघाला. तो अतिशय आनंदात होता. स्वतःच्या आनंदात माधवीला सहभागी करून घेण्यासाठी तो धावपळ करत निघाला होता. रस्त्यावर एक्कादुक्का माणसे होती. त्याने पीयूषचे घर असलेल्या गल्लीत प्रवेश केला. तितक्यात त्याला एक मुंगुस आडवं गेलं. तो मनाशीच म्हणाला, 'व्वा! योगयोग चांगला दिसतोय. अलभ्य लाभ होणार असे दिसतेय. लाभ होईल तो कोणता? माधवीकडून आलिंगन की हवहवसं चुंबन! अशोकने जाणीवपूर्वक दिलेली मूक संमती असतानाही आम्ही 'ती' पायरी ओलांडली नाही. आताही घरी अशोक असणारच..." अशा विचारात पीयूष अशोकच्या घरात शिरला. दिवाणखान्यातील पलंगावर अशोक नसल्याचे पाहून पीयूष सरळ बेडरूममध्ये शिरला. नेहमीप्रमाणे माधवी पलंगावर पहुडली होती. तिला पाहताच पीयूष