आघात - एक प्रेम कथा - 18

  • 6.5k
  • 1
  • 2.7k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (18) तिघांचेही अगदी चेहरे आनंदाने फुलले होते. हाच सुरेश उन्हाळयाच्यासुट्टीत यानं मला पत्र लिहिलं होतं आणि त्याला मी नको नको ते बोललो होतो पण तो ढासळला नाही की खचला नाही. माझ्यासाठी त्यानं नक्की त्रास घेतला होता. त्यांच्याच नाही तर इतर मित्रांसमोरही आज मान वर करून उभारण्याची हिंमत नव्हती. इकडे ते तिघेही आनंदाने न्हाऊन गेले होते. तर माझं इकडे रडणं सुरु झालं होतं. ‘‘प्रशांत रडू नको, जे घडायचं होतं ते घडून गेलं. आता तुला एका जीवनाच्या नवीन टप्प्यावर कलाटणी मिळाली आहे. तुला तुझ्या आजीआजोबांच्या आशाअपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. जे घडलंय ते सारं विसरून जा असे