एक चुकलेली वाट - 4

(15)
  • 15.2k
  • 1
  • 9.2k

एक चुकलेली वाट भाग - ४ प्रकाश बिअर शॉपीच्या समोर एका बाईक जवळ उभ राहून कित्येक वेळपासून दोन तरुण काहीतरी बोलत होते. बोलता बोलता मध्येच इकडे तिकडे कोणी जवळपास तर नाहीये ना ह्याचाही कानोसा घेत होते. एकंदरीत अवतारावरून ओझरत पाहिलं तरी जरा छपरी प्रकारात मोडणारे ते दोघे. प्रकाश बिअर शॉप गावातून थोडंसं बाहेर दोन शहरांना जोडणारी सीमेवर. त्यामुळे मालकाची बऱ्यापैकी कमाई होत असावी. प्रकाश बिअर शॉपी नावाचा झगमगता बोर्ड, मालकाची आर्थिक परिस्थती आणि कलेची आवड दोन्हीही दर्शवत होता. बाकीची दारूची दुकानं बंद राहतील मात्र एक ड्राय डे सोडला तर बाकी नेहमीच हे शॉप चालू असल्याने पिणाऱ्यांच्या जिव्हाळ्याच ठिकाण होत. हे