जुळले प्रेमाचे नाते - भाग-७४

(69)
  • 15.8k
  • 2
  • 6.5k

"अग मी का सोडून जाऊ तुला आणि रागवायचे कशाला. हा आता तू तुझ्यासोबत झालेला प्रसंग नाही सांगितलास म्हणजे अस तर नाही होत ना की मी हे नातं संपवाव. कदाचित ती योग्य वेळ आलीच नसावी की तू तुझ्यासोबत झालेला तो वाईट प्रसंग मला सांगावास. माहीत आहे वाईट प्रसंग सांगायला ही हिम्मत लागते. आणि आपलं नात एवढं ही ठिसूळ नाहीये की या छोट्या मोठ्या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम हॊईल. मी तेव्हा ही तुझ्यासोबत होतो आता ही आहे आणि कायम राहील...""मी तेव्हा ही प्रेम करत होतो, आता ही करतो आणि यापुढे ही काहीही झालं. कितीही वाईट प्रसंग येउदे मी तुझ्यावर तेवढच प्रेम करेन. कारण