निर्णय - भाग ३खिडकीतून येणारा उन्हाचा कवडसा तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्याला स्पर्शून तिला जागवायचा प्रयत्न करत होता. रात्रभर तिचे डोळे झोपेच्या अधीन न झाल्याने एक कंटाळवाणी चुरचुर डोळाभर पसरली होती. तिची ओलसर दबलेली उशी तिच्या रात्रभर जागण्याची कहाणी मूकपणे खुणावत होती. तिने सुजलेल्या डोळ्यांनी मोबाईलकडे पाहिलं. मागच्या काही वर्षांत पहिल्यांदाच तो रात्रभर शांत होता. तिने घाबरतच फोन ऑन केला. त्याचे बरेचसे मिस्डकॉल आणि मेसेजेस तिची वाट बघत होते. खरेतर ती रागातच होती आणि तिला त्याच्याशी बोलायचही नव्हतं पण त्याचे इतके सारे मिस्डकॉल्स बघून तिचा राग विरघळून गेला. लटक्या रागाने तिने त्याचा नंबर डायल केला.... आह...... द नंबर यू आर ट्राइंग इज