नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... - 1

  • 18.9k
  • 5k

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... (1) तालुक्याला सोपानचे आरशे विकायचे दुकान होते. धंदा जोरात चालू होता. हाताखाली दोन तीन कामगार होते. तरीही स्वतः सोपान काम करायचा. त्याला ते आवडायचं. वेगवेगळ्या आकाराचे, नक्षीदार आरशे बनवायचा. चौकोनी, त्रिकोणी, पंचकोनी, गोलाकार, अंडगोलाकृती, कापणीच्या आकाराचे असे विविध प्रकारचे आरशे त्याच्या दुकानात होते. शिवाय, ग्राहकांच्या इच्छेप्रमाणे तो हवे तसे आरशे तो त्यांना बनवून देई. त्याच्याकडे शहरातून आरशाच्या काचा यायच्या. तसेच, जुने विकलेले आणि भंगारातून मिळालेले. काहीशे तुटलेले पण चांगल्या स्थितीतले आरशे तो व्यवस्थित कापून त्यांना वापरण्यायोग्य बनवायचा. दर दोन तीन महिन्यात जुन्या समानांचा ट्रक येत असे. त्यातून वापरण्यायोग्य समान सोपान घेत असे. एकदा एका टेम्पो मधून