शेतकरी माझा भोळा - 1

  • 20.2k
  • 3
  • 7.9k

१)शेतकरी माझा भोळा! रात्रीची वेळ होती. अमावस्येचा अंधार सम्दीकडं पसरला होता. गावात सम्दीकडं सामसूम होती. रातकिड्यांच्या आवाजासोबत पारावरील पोथीकऱ्याने मधूनच उंचावलेला आवाज रातरची शांतता भंग करत होता. देवळात पाच-सात म्हाताऱ्या आणि चार-दोन म्हातारेच काय ते पोथीपुढे बसून होते. पारासमोरील घरात राहणारा गणपत बायकोशेजारी बाजेवर पडला होता."धनी, औंदा हायब्रीडीचा उतार लै चांगला यील आस वाटत...""व्हय. आज सम्दी हायब्रीड कापून टाकली हाय. उंद्या या फार तं परवाच्या दिसी खळं व्हईल. च्यार- आठ रोजात घर हायब्रीडीनं भरून जाईल बघ.