नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... - 2

  • 20.5k
  • 1
  • 5.6k

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... (2) चार पाच दिवस सोपान दुसऱ्या कामात व्यस्त होता, त्यामुळे त्याला बबनरावांच्या कामाला हात लावायला वेळ मिळाला नाही. मात्र, जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा सोपानला ते काम हाती घ्यावंच लागलं. सोपानने दोन तीन दिवस मेहनत करून अगदी हुबेहुन तसाच दिसणारा आरसा बनवला. बाकीचे कामगारही वाह वाह करू लागले. आज बबनरावांना फोन करून आरसा पाठवून देतो म्हणून सोपान सांगणार होता. कामगार आरसा ठेवण्यासाठी लाकडी फळ्यांचं एक पॅकिंग बनवत होते. बॉक्स बनवून झाल्यावर सोपानने तो व्यवस्थित असल्याची खात्री केली आणि आरसा आतमध्ये ठेवायला सांगितलं. बॉक्स मध्ये आरसा ठेवला गेला. फोन करण्यासाठी तो आपल्या काउंटरकडे जाऊ लागला, तोच