नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... - 3

  • 13.1k
  • 6.7k

नको चंद्र तारे, फुलांचे पसारे.... (3) बाहेर काळाकुट्ट अंधार पसरला होता. चंद्रही नव्हता, फक्त चांदण्यांची लुकलूक. आज शनिवार, निता बोटांवर दिवस मोजत होती. आणखी सात आठ दिवसांनी लग्न होतं. कानात हेडफोन लावून ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर फोनवर गप्पा मारत होती. बेडच्या समोरच लावलेल्या आरश्यात पाहत ती केसांशी खेळत होती. खिडकीतून मंद गार वारा येत होता. तिच्या गालाला हलकेच स्पर्शून जात होता. ती लाजत होती, हळूच हसत होती. हॉलमधल्या दोलकाच्या घड्याळात अकराचे टोले पडत होते. अचानक खिडकीतून येणार वारा शांत झाला. वातावरणात एक गूढ शांतता पसरली. ती शनिवारची रात्र होती. अमावस्या! रूममधील नाईट बल्ब लुकलुकू लागला. समोर आरश्यात नंदाची प्रतिमा धूसर