शेतकरी माझा भोळा - 3

  • 9.3k
  • 4.7k

३) शेतकरी माझा भोळा! येकदा का कास्तकारायचे आगुंठे घिवून त्यांचे हात तोडल्यावर पुढील काम व्हायला वेळ त्यो किती लागणार? फाता-फाता क्यानालचं काम बी पुर झालं. येक एक्कर म्हन्ता म्हन्ता गणपतचा तीन येक्करचा तुकडा क्यानालात गेला. त्यो बी वावराच्या बराबर मधून. भावा-भावाची वाटणी होवावं त्या परमानं ! क्यानालच्या दोही बाजूनं समान जिमिन ऱ्हायली. क्यानालचं बांधकाम सुरु आस्ताना गावातल्या शिरिमंतांची मजा झाली. क्यानालात पाणी वाहील तवा वाहील पर बांधकामाच्या वाहत्या गंगेमंदी लोकायनं हात धुवून घेतले. सीतापूरपरमानं क्यानालच्या पट्ट्यात येणाच्या समद्या गावाची चांदी झाली.