शुभ बुद्धीचे उपासक रवींद्रनाथ(पुस्तक परीक्षण)

  • 14k
  • 3.9k

फूल फुलले हीच फुलाची अंतिम कथा फुलाचे साफल्य त्याच्या बहरण्यात आहे फूल विचारते,"फळा, तू कुठे आहेस?" फळ उत्तरते," मी तुझ्या हृदयातच आहे"!!! वाचल्याक्षणी मनावर मोहिनी घालणारे हे शब्द नव्हे काव्य आहे गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुर यांचे! (ठाकूर हे त्यांचे मूळ आडनाव पण ब्रिटिशांनी तो उच्चार टागोर असा बदलला आणि पुढे तेच प्रचलित झाले) रवींद्रनाथ म्हटलं की आधी समोर येतं शांतिनिकेतन आणि बंगाली चित्रपटांमधून ऐकलेलं आणि हिंदी चित्रपटगीतातही वापरलं गेलेलं रविंद्र संगीत! हे पुस्तक म्हणजेही एक चित्र- पटच आहे! रवींद्रनाथांच्या सौंदर्यपूर्ण,कलासक्त आणि स्वतःच्या विचाराने प्रेरित झालेल्या आयुष्याचा! लेखिका आशा साठे आपल्याला या पुस्तकांत रवींद्रनाथांच्या बरोबरीने आयुष्याचा अनुभव देतात,तशी संधी देतात! रवींद्रनाथ यांचा