लग्नाआधीची गोष्ट - (भाग 8)

(17)
  • 9.2k
  • 4.2k

तिने माझा स्वीकार केल्याचे मला सांगितले मी हि खुश झालो.फोनवर फोन चालू झाले.एव्हाना तिच्या घरच्यांशी ही माझं बोलणं सुरु झाले.तिच्या वडिलांशीही मी आता थोडा मनमिळाऊ बोलू लागलो होतो.एक घटना ऐकून मला तिच्या आईचा अजूनच अभिमान वाटू लागला.खूप वर्षापूर्वी जेव्हा सपना लहान होती तेव्हा त्यांना एक लहान मुल भेटल होते त्यांनी त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवला होता.त्या मुलाच्या आई वडिलांचा अपघातात मृत्यू झाला होता. मी त्या कुटूंबाशी जोडलो गेलो होतो. ते मलाही एक कुटूंब वाटत होते. सपना व मी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला होता व त्यानंतर मी घरच्यांना भेटायला पण जाणार होतो.तिचे गाव कोल्हापूर असल्यामुळे मी तिला रंकाळा या तलावाजवळ भेटण्याचे ठरवले.