आईचे दूध -एक ममता

  • 5.6k
  • 1.7k

पूर्णा नदी काठी वसलेलं रामपूर नामक गाव. यंदा पाऊस न पडल्यामुळे गावातील प्रत्येकाची परिस्थिती हलाकीची होती. म्हणून गावातील सावकाराकडून काही लोक कर्ज घेत असत.सावकार देखील जमिनीच्या बोलीवर कर्ज द्यायचा.गावातील बाळासाहेब पाटील हे सरपंच.सलग पाच वेळा ते गावचे एकमेव सरपंच. घरी अमाप संपत्ती अन 50 एकर शेतजमिनीचे एकमेव मालक. त्यांचा स्वभाव एकदम हळवा. प्रत्येकजण त्यांच्याशी प्रेमाने बोलत असत. दर रविवारी ते ग्रामपंचायत मध्ये ग्राम सभा बोलवत. ग्रामसभेत गावातील प्रत्येकाच्या अडचणी ते समजून घेत अन शक्यतोर मदत करायला नेहमी पुढाकार घेऊन पुरेपुर मदत करत.बाळासाहेब पाटील यांना एकुलता एक मुलगा.कुलभूषण, एकुलता एक असल्या कारणाने सरपंचाच्या घरातील अन कामाला येणाऱ्या प्रत्येक जणांच्या लाडाने तो