शेतकरी माझा भोळा - 5

  • 9.1k
  • 3.3k

५) शेतकरी माझा भोळा! कोंडबा मोटारीतून उतरला आन् पायी पायी घराकडं निघाला. स्टँडपासून गाव चार फरलांग दूर व्हत. तेव्हढ अंतर पायी चालाय लागायच. न्हाई म्हणाया दोन ऑटो व्हते पर त्ये मान्सी पाच रुपै घेयाचे. तेव्हढे पैयसे कोंडबापाशी नसायचे त्यो हमेशा पायीच निघायचा. त्या दिशीबी त्यो पायीच सीतापूरकडं निंघला. दोन-आडीच फरलांग आला आन् त्येच ध्यान सडकेला चिकटून असलेल्या त्येच्या जिमिनीकड गेलं. दोन-आडीच येकरचा त्यो तुकडा नुस्ता खडकाळ व्हता. ह्ये मोठाले धोंडे पडले व्हते. कोंडबाच्या घरी आठरा-ईस्व दरिद्री असल्यामुळे त्येच्या आज्ज्यापासून म्हंजी जवळ-जवळ