घुंगरू - 8

  • 8.1k
  • 3.2k

#@ घुंगरू@# सौ.वनिता स. भोगील ....रत्नमाला..... बापू , माई आणि मालतीच्या काळजाचा तुकडा..... मालतीला आईपण मिळालं होतं, बापुना बाप होण्याचं भाग्य आणि माई तर नातीच्या स्वप्नात गुंग असायच्या.......दिवसा मागून दिवस जात होते, रत्ना रांगु लागली, माईंनी तिच्यासाठी साठवणीतल्या पैशातून पैंजण आणले, नातीच कोड कौतुक करण्यात माई रमून जात,... रत्ना लुटू लुटू चालू लागली, गोर गोमट बाळ गुटगुटीत अगदी वाडा फिरवून माईना दमवून टाकायच...... बापू तर काय रत्ना म्हणजे जीव च होता त्यांचा, हळू हळू रत्ना मोठी झाली बोबडे बोल सोडून चांगलं बोलू लागली, बापुना रत्नाचा नाव गावातल्या शाळेत घातलं, रत्ना घरच्यांची लाडकी तशीच गावातल्या सगळ्यांची लाडकी होती....... बापू