निर्णय - भाग ६जळणाऱ्या काळजाची धग आसू बनून तिच्या डोळ्यातून बरसत राहायची फक्त. त्याच्यासोबतच्या आठवणी तिचा मेंदू पोखरून खायच्या. उण्यापुऱ्या दोन वर्षांच रिलेशन. पण घरच्या लावलेल्या दह्यासारखं अगदी घट्ट होत. कोण कोनात मिसळून गेलं होतं हे सांगण कठीण. तीच तर अख्ख आयुष्य साखरेसारखं विरघळून गेलं होतं त्याच्यात. रुसवे, फुगवे, लटकी भांडण, प्रेमाच्या आणाभाका, एकत्र राहण्याची वचन आणि एकमेकांवर सर्वस्व उधळून द्यायची ओढ. त्यांच्या पहिल्याच भेटीत त्याने गारुड घातलं होत तिच्या मनावर. त्यानंतरचा प्रत्येक दिवस ती त्याच्या प्रेमात भरल्याप्रमाणे त्याची सावलीच बनून गेली होती. एखाद स्वप्न बघावं तसं ते प्रेमात पडले. ट्रेकच्या ओळखीनंतर असच एकदा सहजच फेरफटका म्हणून माथेरानचीही चक्कर घडलेली. भल्या