शेतकरी माझा भोळा - 6

  • 9.4k
  • 3.1k

६) शेतकरी माझा भोळा! वावराचा बैयनामा झाला आन् तात्यासायबाच्या वळखीन दोन हजारात बेण्याचा सौदा झाला. बेण आणून त्येनं वावरात लावल. तात्यासायेबाच्या वळखीनच कोंडबाला बैंकनं जीपसाठी बी रीन देलं. पच्चीस हजार रुपै भरावं लागले पर काम झालं. धाव्या दिशी गणपतच्या घराम्होरी जीप ऊबी ऱ्हायली. तव्हा गणपत, यस्वदा, कोंडबा आन् सखीला बी आसमान ठेणगं झालं. सीतापूरात ह्ये बी येक नवलच झालं. समदं गाव जीप फायला उल्टलं. जसा काय गणपतीच्या घरी कोन्ता मोठ्ठा महाराज आला व्हता. सांच्या पारी आबासायेबाचं बलीवण आलं.गणपतला फाताच आबा