समर्पण - ५

(11)
  • 12.2k
  • 6.3k

समर्पण-५ विक्रम ला गाण्याची फार आवड होती. त्याला खरं तर गायन क्षेत्रातच नाव कारायच होत अस नेहमी म्हणायचा तो पण जबाबदाऱ्या निभावता निभावता ते राहूनच गेलं. पण माझा त्याला नेहमी आग्रह असायचा की त्याने त्याची आवड जपावी. तो मला रोज एक गाणं म्हणुन दाखवायचा. त्याची ईच्छा होती त्याच्या एखाद्या कार्यक्रमात माझ्या समोर माझ्या डोळयांत बघून गायची. माहीत नव्हतं ही ईच्छा कधी पूर्ण होणार होती, पण त्या आधी त्याची मला भेटायची खूप इच्छा होती. खरं तर मला ही खूप ओढ लागली होती त्याला भेटायची पण काही वेळ च मिळत नव्हता. पण म्हणतात ना जर मनाने काही ठरवलं तर आपण ते करतोच.