#@ घुंगरू@#भाग 9 सौ. वनिता स. भोगील गाडी आलेली पाहून मालती वाड्याच्या दाराशी आली, रत्ना उतरली, मागे बापू पण बैलगाडीतून उतरले, बापुच्या हातातली पिशवी घेत मालती म्हणाली.... लय येळ लावलासा? भर ऊन डोईवर घेतलं, दुखणी येत्याल अशान , आवाज ऐकून माई जपमाळ गुंडाळत बाहेर आल्या, आला का बाप लेकीचा बाजार? दिस घालीवला, काय बाकी न्हाय ठेवल वाटत आणायचं??.... त्यावर बापू म्हणाले.. माई रत्नाचा बाजार काय संपणा,,,, कसतरी घेऊन आलो बघ ........ तोवर तर रत्नानं पिशवीतून सगळं समान बाहेर काढायला सुरवात केली, आई बघ म्या काय काय आणलं, ही बघ रिबीनी, हय नकपालिस...