७) शेतकरी माझा भोळा! कारखाना सुरु झाला व्हता. चेरमनपदी आबासायेबाची निवड झाली. त्येच्यासंग दुसरे धा डैरेक्टर बी नेमले व्हते. कारखान्याचा पैयलाच हंगाम! क्यानालच्या पाण्यावर ऊस लावलेले शेतकरी बी लै व्हते. समद्यांना ऊस पोचवायची गडबड व्हती. सीतापूरात पैल्या नंब्रावर आसणाऱ्या गणपतच्या फडानं मातर मान टाकाय सुरुवात केल्ती. एव्हढया बिगीनं कार्खाना ऊस ऊचलायची काय बी चिन्न न्हवती. ऊसाला एखाद-दुसरं पाणी देवून दीड-दोन म्हैन्यात पुना ऊसाला टवटवीत कराव म्हणून गणपत आन् यस्वदा क्यानालला पाणी सुटायची वाट फात व्हते. मातर पाणी