आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (28) प्रिय मित्र प्रशांत पत्र लिहिण्याचं कारण की कोणता दोष होता असा माझा? काय चूक होती माझी? की तू मला न सांगता असा रागारागाने गेलास. हेच तुझं नि:स्वार्थी प्रेम काय? तूच काय माझ्यासाठी काहीही करायला तयार असणारा प्रियकर? तुझी गरज भागताच तू निघून गेलास! पण मी काय करायचे? संसाराचं सुखी स्वप्न रंगविणारा तू. कुठं गेलं ते तुझं प्रेम? इतकी आतुरता होती, गावची, घरची मग प्रेम का केलंस माझ्याशी, का माझा कामापुरता वापर केलास तू? मी आजपर्यंत तुझी कोणती गोष्ट नाही म्हटली का? तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण केलेल्या आहेत.प्रसंगी सगळयांचा विरोध डावलून. तू माझ्याशी