परवड भाग 2

  • 12.2k
  • 7.7k

परवड भाग-२ (अनर्थ) “आजपासून या आंधळ्याला मी बिलकूल सांभाळणार नाही. सोडून या कुठंही! यापुढे मला याच तोंडही बघायचं नाही! जोपर्यंत हा आंधळा घरात आहे तोपर्यंत मी या घरात पाऊल ठेवणार नाही!” भरपूर आकांडतांडव करत सुनंदा राहुलला-तिच्या सख्ख्या मुलाला घेवून घर सोडून गेली होती.... त्यावेळी अरविंदा आणि सुनंदा यांच्यात चाललेला वाद बघायला सगळे शेजारी जमले होते;पण एकानेही सुनंदाला समजावून सांगायचा प्रयत्न केला नाही.अरविंदाने तिची खूप मनधरणी करायचा प्रयत्न केला.राहुलची शपथ घातली;पण त्यालाही ती बधली नाही. तिचा वसंताला घरातून घालवून द्यायचा हट्ट कायमच होता.शेवटी तर अरविंदाने सुनंदाच्या पायावर लोळण घेतले,तिची माफी मागितली.काकुळतीला येवून आपल्या अंध लेकरासाठी दयेची भीक मागितली;पण सुनंदावर काडीचाही फरक