चाय कट्टा - भाग पहिला

  • 7.5k
  • 3.3k

भाग एक :- नशीब पावसाळा सुरू होणार होता. आणि पावसाचा चांगला आनंद लुटायचा असेल तर पुण्याहून चांगले ठिकाणचं नाही. थंड हवेचे वारे त्यात ढगाळ वातावरण प्रत्येक संध्याकाळ रमणीय करण्याची ताकत ठेवतात, आणि अशा वातावरणात हाती चहाचा कप आणि बाल्कनीत खुर्ची टाकुन समोरचं चित्र न्याहाळत बसणं मग आणखी कशाला सुख म्हणावं! मंदारला पुण्यात राहून सहा-सात वर्ष झाली होती. इथे आल्यापासून त्याला निसर्गासोबतत्याला वेगळीच आपुलकी वाटायला लागली. तो निसर्गप्रेमी झाला. सुट्टी असली की कुठं फिरू आणि कुठं नको असं व्हायचं. तो आणि त्याचे तीन-चार मित्र मिळून एका फ्लॅट मध्ये राहायचे. मंदार हा डॉक्टरकीच्या शेवटच्या वर्षाला