शेतकरी माझा भोळा - 8

  • 6.7k
  • 2.6k

८) शेतकरी माझा भोळा! कलाकेंदरातून पैका घिऊन गणपत सीतापूरला आला. त्येला येसीतच आबासायेबाचा गडी भेटला. तो म्हण्ला, "गणपत, आर कोठ कोठ धुंडावं तुला. चल, आबासाबानं तुला बलीवलंय." गड्याच्या माघ मांघ गणपत सरपंचाकडं गेला. त्येला फाताच सरपंच म्हण्ले,"गणपत, काय ठरवलस बा जीपीच?""मालक, म्या काय...""म्या बैंकत फायलं, तुमी आतापस्तोर येकच हप्ता भरला हाय. त्यो बी सम्दा याजात गेला. आजच्या घडीला त्या जीपीपरीस नई जीप घेतल्याली परवडती. पर आस हाय तू मझा माणूस हाय. तुही हर वक्ती फसगतच झाली म्हून म्या