प्रेम हे..! - 26

(32)
  • 10.4k
  • 6
  • 3.5k

........विहान ने तिच्या भोवतीची मिठी सैल केली आणि तो सरळ चालायला लागला... सरळ जाऊन कार मध्ये बसला आणि निघून गेला... निहिरा मात्र गोंधळून त्याच्याच कडे बघत राहिली...!! विहान घरी आला.. आणि एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखा सोफ्यावर बसला.. तो निहिराचाच विचार करत होता... ? गेले दोन दिवस तो निहिरा सोबत जे वागला होता त्याचं त्याला खूप वाईट वाटत होतं... आपण असं कसं वागू शकतो तिच्यासोबत...?? ती आपल्यासाठी इथपर्यंत आली...आपल्याला भेटण्यासाठी ऑफिस च्या फेर्‍या मारल्या... तिने तिची चूक मान्य केली तरीही आपण तिला हर्ट केलं... ?? ती कधीपासून आलीये इथे .. कुठे राहते.. सोबत कोणी आहे की एकटीच आहे.. आपण साधी चौकशी ही