आघात - एक प्रेम कथा - 30

(13)
  • 5.8k
  • 2.1k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (30) शेजारीपाजरी घरात सांगायला यायचे. आजोबा काकुळतीला आल्यागत सारं ऐकायचे. प्रत्येकाला माझी समजून काढायला लावायचे. पण मी हे सारं थोडंच मनावर घेणार होतो. मला फक्त डोळ्यासमोर दिसत होती सुमैया. एकेकदा वाटायचं माझी वाट बघून ती दुसरा कोणीतरी जोडीदार तरी निवडणार नाही ना? किंवा आईवडील घाईगडबडीने तिचे लग्न तर लावून देणार नाहीत ना? असं वरचेवर मनाला वाटायचे. खरंच आपण वेळ करता कामा नये. नाही तर एकदा वेळ गेली की आयुष्यभर पश्चाताप करत बसायची वेळ येईल ही भिती वाटायची.अगोदरचं पत्र पाठवून सुमैयानं आपली नाराजी व्यक्त केली होती. पण आता आपण सावध व्हायला हवं होतं की, ती