साहित्य -समीक्षा -लेखन - भाग -५

  • 6.5k
  • 2
  • 2.5k

१. पुस्तक परिचय-" लेखक- अरुण वि.देशपांडे---------------------------------------------" चांदोबाचा दिवा " ... बालमित्रांसाठी धमाल बालकवितासंग्रह ------------------------------------------------------------------------विजयकुमार देशपांडे हे सोलापूरचे कवी, गझलकार, चारोळीकार, त्याचबरोबर मिस्कील आणि हलकेफुलके लेखन करणारे साहित्यकार आहेत. विविध वर्तमानपत्रांच्या पुरवणी, मासिके आणि दिवाळी अंकातून यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. बालमित्रांसाठीही ते आवर्जून लेखन करतात. किशोर मासिकात कविता प्रकाशित, तसेच पुणे आकाशवाणीवरून त्यांचे बालकवितावाचन प्रसारित झाले आहे.इंटरनेटच्या दुनियेत त्यांनी स्वतःचा वाचक-वर्ग निर्माण केला आहे."लेखन प्रपंच" या त्यांच्या ब्लॉगवर त्यांचे साहित्य उपलब्ध असते.या वाटचालीत त्यांच्या ४० बाल -कवितांचा संग्रह "चांदोबाचा दिवा " या शीर्षकाने प्रकाशित झाला आहे., त्याचा परिचय मी करून देत आहे.बालकवितांना आशयानुरूप रेखाटने आणि चित्र असणे, या कवितांच्या बालवाचकांसाठी