आघात - एक प्रेम कथा - 31 - अंतिम भाग

(28)
  • 8.6k
  • 2
  • 3.1k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (31) ‘‘बरं ते जाऊ दे, आता जे झालंय तीच गोष्ट बोलत बसण्यात काहीच अर्थ नाही. पुढली दिशा काय ते ठरवं.’’ ‘‘आता कुठली आलीया पुढची दिशा, माझ्या दिशांवर अंधार पसरलायण आता.’’ ‘‘असं बोलून खचू नको काहीतरी हालचाल केल्याशिवाय तुला पर्याय नाही. बघ प्रयत्न करू. तुम्हा दोघांमध्ये आणखी माझी अडचण नको. बसा बोलत तुम्ही. मी जाते, मला वेळ होतोय.’’ स्नेहल निघून गेली. आता होतो फक्त सुमैया आणि मी. ‘‘काय रे अभ्यास अजिबात केला नाहीस का? तू नापास होशील अशी कल्पनादेखील केली नव्हती. माझीही सगळी स्वप्न भंग केलीयस. पुढचं प्लॅनिंग सगळं विस्कटून टाकलंयस.’’ ‘‘म्हणजे काय बोलतीस तू?’’