परवड भाग 3

  • 11.7k
  • 6.7k

भाग तीन... वसंता आता ठार आंधळा झाला होता.....एका सख्ख्या जुळ्या भावाच्या अविवेकी वागण्यामुळे दुसऱ्या भावाचे जीवन बरबाद होऊ घातले होते! आपल्यामुळे आपल्या भावाच्या- वसंताच्या डोळ्याची झालेली ती अवस्था बघून बिनधास्त असलेल्या गुणवंताला आता थोडफार भान आल होते.आपल्या आक्रस्ताळी वागण्याने आपल्या भावाचे डोळे गेले या जाणीवेने त्यालाही खूप वाईट वाटायला लागलं होत.लोकांच्या नजरेत आता आपण गुन्हेगार आहोत हा विचार सारखा त्याच्या डोक्यात फिरत होता.त्याला आता पश्चाताप झाला होता;पण आता वेळ निघून गेली होती.व्हायचं ते नुकसान भरून येणार नव्हत! अरविंदा अक्षरशः हताश झाला होता तर सीता मनाने पार खचून गेली होती.शेवटी काळ हेच सर्व घावांवरचे जालीम औषध असते! दिवस जात