दोन टोकं. भाग ११

  • 13.4k
  • 7.2k

भाग ११विशाखा आश्रमात फक्त शनिवार आणि रविवारीच जायची. आणि सायली शनिवारचा पुर्ण दिवस तिकडेच असायची. तसं तर सुट्टी म्हणलं की सगळ्याच पोरी सकाळी ८-९ पर्यंत झोपायच्या. आज सकाळी सकाळीच काकाने सायलीला कॉल केला. सायली कॉलेजला अॅडमिशन घ्यायला गेली होती. काकाचा कॉल कट करून त्याला मेसेज केला की नंतर कॉल करते. मग पटपट अॅडमिशनच काम करून तिकडे गेली. ती पोहोचली तेव्हा दहा वाजत आले होते. घरात जाऊन बघितलं तर सगळं सामसुम. काका सोडलं तर कोणच दिसत नव्हतं. " इतना सन्नाटा क्यों है भाई...... " सायली ने घरभर नजर फिरवत विचारलं. " एक जण उठलं नाही. सगळे झोपलेत. " " काय ?. दहा वाजायला आलेत