शेतकरी माझा भोळा - 12

  • 7.2k
  • 2.9k

१२) शेतकरी माझा भोळा! मे म्हैयना सुरु व्हता. मे म्हैन्याची आनी ऊन्हाची मैतरी लै दाट. दोघबी येकमेकायचे जीवापाड मैतर! दोघायचं पिरेम आस्स ऊतू जात्ये की सम्द जग त्येंच्या पिरेमाचे चटके सोसत्ये पर त्येंची त्या दोघायलाबी जाण नसत्ये, त्ये आपल्याच नशेत दंग ऱ्हात्यात, सम्द ईसरुन येकमेकाला भरभरुन पिरेम देत्यात. सीतापूरात वैशाकाच्या ऊन्हाचा कोलाहल माजला व्हता. समद्यांना त्राहीत्राही करुन सोडले व्हते. फाटे नौ वाजल्यापासून बाहीर त्वांड काढायची सोय न्हवती. घरामंदी बसले तरी ऊकडल्यावाणी व्हायचं. आंगाचं नुस्त पाणी-पाणी व्हयाच. पाडवा झाला. नव साल सुरु