स्पर्श - भाग 3

(27)
  • 28.1k
  • 20.7k

ती माझ्यासमोर तशीच उभी होती ..मी आता तिची प्रत्येक हालचाल टिपू लागलो ..तिच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझापही आवडू लागली ..तिच्या चेहऱ्यावर अस्खलित तेज होत ..ती गोरी तर होतीच पण त्या तेजाने आणखी चेहरा खुलून दिसत होता ..तिच्यापासून नजरसुद्धा हटायला तयार नव्हती जणू तिला आयुष्यभर साठवून घ्यायची इच्छा नजरेने व्यक्त केली होती ..मी तिच्याकडे एकाग्र होऊन पाहताना सोनाली म्हणाली , " अभिनव झालं की रे बघून तिला नाही तर तुझीच नजर लागेल बघ आणि आपला कलास आहे आता तेव्हा चल बघू " मी नाराज होऊन म्हणालो , " ए नाही ना थाम्ब हा थोडं !! बघू दे तिला मग जाउया की काय