नवनाथ महात्म्य भाग ३

  • 17.3k
  • 2
  • 10.3k

नवनाथ महात्म्य भाग ३ थोड्याच वेळात ते दोघेही खाली उतरून गर्द जंगलात प्रवेशले. वनराज सिंहाने डरकाळी फोडून दोघांना सावध करण्याचा प्रयत्न केला! वनराईचे निसर्ग सौंदर्य पाहून दत्त हरपून गेले. एका औदुंबर वृक्षाच्या छायेत बसले. मच्छिंद्रनाथांना दत्तात्रय म्हणाले, "तु जगाच्या कल्याणासाठी दारोदार फिरलास. भिक्षेच्या रूपात लोकांचे दैन्य-दुःख झोळीत घेतलेस. मायास्वरूपात जरी स्त्री राज्यात गेलास तरी लोकांचे बोल तुला सोसावे लागले. पण नियतीपुढे मलाही झुकावे लागते. आता तुला जवळ घ्यायची माझी इच्छा आहे . मच्छिंद्रनाथाने जाऊन अनसुयात्मजाला कंठभेट दिली. थोड्या वेळाने मच्छिंद्रनाथ म्हणाले, "हे करुणानिधी आपण असे भावनाविवश झालेले मला पहावत नाही. तुम्ही जाणता लोकोद्धारासाठी मला आपल्यापासून व गिरनार पासून पुन्हा विलग