नवनाथ महात्म्य भाग ४

  • 14.4k
  • 1
  • 7.3k

नवनाथ महात्म्य भाग ४ घराची मालकीण पुन्हा घराबाहेर आली आणि दारात उभ्या असलेल्या गोरखनाथला पाहुन रागावली आणि सभ्य आवाजात म्हणाली , मी तुम्हाला अगोदरच खायला दिले होते तरी तुमचे पोट भरले नाही की काय? तो म्हणाला, माझे गुरु माझ्यासोबत आहेत . तुम्ही दिलेली सामग्री गुरुदेवासमोर ठेवली, ती त्यांनी खुप आवडीने खाल्ली, तरीही अजून दोन दहीवडे खाण्याची त्यांना इच्छा आहे, म्हणून त्यांच्या आग्रहाकरीता मला पुन्हा तुमच्या दाराजवळ यावे लागले. हे ऐकून मालकीण म्हणाली की मी तुला पाहु शकते तुझ्या मनातले नाही. तु खोटारडा आहेस दहीवडे तुला हवे आहेत खोटे बोलुन तु आपल्या गुरूचे नाव बदनाम करीत आहेस . तो मोठ्या आवाजात