१५) शेतकरी माझा भोळा! दोन-च्यार रोजात गणपतचा कापुस येचून झाला. घर सम्द कपाशीन भरलं. पाचव्या रोजी फाटेचे धा वाजत व्हते. यस्वदा म्हण्ली, "आव्हो, कपासीची सरकारी खरेदी आजूक सुरु झाली का न्हाई?""व्हईल, दोन च्यार दिसात.""काय सांगावं बाई, सम्दा कापुस यीवून पडला पर ह्ये सरकार आजूक बी जाग झालं न्हाई. केंद्र सुरु झाल्यावर बी धा-धा दिस नंबर लागत न्हाई, आज कापुस जाया फायजे व्हता. पर सरकारला सांगावं कुणी?""गणप्या... आरं गणपती...""कोण? किसान देवा? या व्हो या.""आता या म्हन्ताल तरी बी आलू.