मंतरलेली काळरात्र (भाग-३)

  • 6.6k
  • 2.4k

( मंतरलेली काळरात्र भाग-३)मी आता गावाच्या दिशेने भर भर पाय उचलत निघालो होतो. आता गावाच्या खूप जवळ पोहोचलो होतो परंतू आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या काळ्याकुट्ट अंधारात गाव हरवले होते मला गाव दिसेनासे झाले होते, मी आता तसाच त्या अंधारात गाव शोधू लागलो , गावाच्या खूप जवळ आलोय हे माझ्या लक्षात आले कारण गावातील मोकाट कुत्रे मला भुंकायला लागली ,त्यावरून मला अंदाज आला , मी माझा दुकानदार मित्र रघू कडे जाण्याचे ठरवले होते , त्याच्या घरासमोर येऊन पोहोचलो होतो आता कुठे पावसाचा जोर कमी झाला ,परंतु रिमझिम अजूनही चालू होती,मी रघुच्या घरासमोर उभा होतो तसे रघुचे घर आणि दुकान एकत्रच होते