रिकामपण

  • 5.3k
  • 2.1k

#रिकामपण "या या, खूप दिवसांनी येणं केलंत, खूप आनंद झाला माधवराव तुम्हाला भेटून !!".... मी माधवरावांना अगत्याने सोफ्यावर बसायला सांगितलं. माधवराव आमच्या ऑफिस मधील सिनियर सहकारी होते. आठ नऊ वर्षांपूर्वी रिटायर झाले त्यानंतर आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो. "सहज या बाजूला एका नातेवाईकांकडे आलो म्हटलं आज सुट्टीचा दिवस आहे. घरी असाल तर तुम्हाला भेटून जावं म्हणून आलो. "..... माधवरावानी उत्तर दिले. " तुमचं घर छान वस्तीत व प्रशस्त आहे.वास्तुशांतीला ऑफिसच्या स्टाफ बरोबर आलो होतो. त्यावेळी नीट पाहता आलं नाही. ".....माधवराव आपुलकीने म्हणाले. नंतर बराच वेळ आम्ही ऑफिसच्या गप्पा गोष्टी सांगत बसलो होतो. त्यांच्या वेळच्या सिनियर साहेब