नवनाथ महात्म्य भाग ६

  • 10.1k
  • 4.4k

नवनाथ महात्म्य भाग ६ एके दिवशी गावातील मंडळी जमली असता नाथ त्यांना म्हणाले, ”बाबांनो, प्रपंचामध्ये कधीच कोणाला पुर्ण सुख मिळाले नाही, म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि भगवंताचे नाम घ्यावे. भगवंताची निरपेक्ष सेवा करावी. यातच खरा आनंद आहे.” त्यांचे हे बोलणे ऐकून साठ वर्षांचे एक गृहस्थ एकदम चिडून नाथांना म्हणाले, ”प्रपंचामध्ये समाधानी रहावे, असे सांगायला काय जाते,पण ते शक्य आहे का? माझंच बघा, माझा एक मुलगा बारा वर्षांचा आहे, त्याची अजुन मुंज व्हायची आहे. दुसरा मुलगा अठरा वर्षांचा आहे, त्याचे शिक्षण अर्धवट झालेले आहे. सर्वांत मोठी मुलगी आहे तिला वीस वर्षे पूर्ण झाली, तरी तिचे लग्न जमत