भाग १५ विशाखा गाडी घेऊन सायली कडे लगेच निघाली. गाडीवर जाताना पण एकटीच बडबडत होती ती. " आता जाते आणि चांगलीच झापते. मला ignore करते काय. हलवा आहे का ?? मी काय गुत्त घेतलंय तिला समजून घ्यायचं. हा काका काहिही बडबडेल पण म्हणून काय त्याच ऐकत बसु काय मी. हम हम है. आता जाते आणि डायरेक्ट कॉलर पकडते आणि सांगते. अरे पण ती तर कॉलर वाले ड्रेस नाही घालत. हां, कानाखालीच मारते तीच्या आणि मग सांगते तीला. की एएए हे बघ. जे कोणी नवीन येईल त्यांना आपल्यापासून दूर ठेवायचं. आणि दुस-यांमुळे मला दुर्लक्ष करायचं नाही. " विशाखा स्वत:शीच बडबडत सायलीच्या