परवड भाग ५

  • 14.2k
  • 5.9k

भाग ५ . आपल्या लग्नानंतरच्या रम्य जीवनाची स्वप्ने गुणवंता दिवसाउजेडीही बघायला लागला.आतापर्यंत आजूबाजूला दिसणाऱ्या मुलींच्याकडे तो सहसा पहात नसायचा;पण आता समोर येणारी प्रत्येक मुलगी वा तरुण स्री दिसली की, “आपली होणारी बायको अशी असली तर....?” नकळत त्याच्या कल्पनेतल्या बायकोच्या प्रतिमेशी तो समोरच्या मुलीची तुलना करू लागला,रात्रंदिवस आपल्या वैवाहिक जीवनाबद्दलची दिवास्वप्ने त्याला पडायला लागली. झोपेत त्याला शृंगारिक चावट स्वप्नेही पडायला लागली! दुसऱ्या दिवशी गुणवंताचा उजळलेला चेहरा पाहून अरविंदाला बरे वाटले. त्याने खात्रीदाखल त्याला विचारले...“ काय मग गुणवंता, करायची का पोरी बघायला सुरुवात?” त्याने हळूच होकारार्थी मान हलवली. गुणवंताच्या लग्नासाठीच्या होकाराने अरविंदामधे एक वेगळाच उत्साह संचारला. आता तो आपल्या घरासाठी योग्य अशी सून शोधण्यासाठी