नवनाथ महात्म्य भाग ७

  • 11.3k
  • 4.5k

नवनाथ महात्म्य भाग ७ तिसरा अवतार “ गहिनीनाथ” ============== नवनाथांपैकी एक असलेले गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरू होते. गहिनीनाथांचा मातीच्या पुतळ्यापासून जन्म झाला होता . मधुनाभा ब्राह्मणाकडून त्यांचे संगोपन झाले होते . त्यांच्या जन्माची कथा अशी आहे . कनकागिरी गावात मच्छिंद्राने गोरक्षनाथास उपदेश करून सर्व वेदशास्त्रांत प्रवीण केले, चौदा विद्याहि त्यास पक्क्या पढविल्या. सकल अस्त्रात वाकबगार केले. साबरी विद्या शिकविली व सर्व देवाच्या पायांवर त्यास घातले. नरशी, कालिका, म्हंदा, म्हैशासुर, झोटिंग वेताळ, मारुती, श्रीराम इत्यादिकांची दर्शने करविली. जेव्हा रामाची भेट झाली, तेव्हा रामाने गोरक्षनाथास मांडीवर बसवून आशीर्वाद दिले. बावन्न वीरांसहवर्तमान श्रीराम, सूर्य, आदिकरून सर्वांनी गोरक्षास वरदाने दिली व त्यास तपाला बसविण्यासाठी