अपराध कुणाचा शिक्षा कुणाला? - 2

  • 8.4k
  • 3.7k

(२) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? अत्यंत दुःखी अंतःकरणाने लताला घेऊन निघालेले वामनराव सहकुटुंब सायंकाळच्या सुमारास ते राहत असलेल्या गल्लीत पोहोचले. पण वातावरण कसे बदललेले, साशंक दिसत होते. नेहमीप्रमाणे कुणी त्यांचे स्वागत तर सोडा पण साधे हसून किंवा शब्दाने विचारपूसही केली नाही. कुणी नजरानजर होताच नजर वळवली. कुणी रागाने, अविश्वासाने पाहिले. कुणी नाक मुरडले. हे असे का व्हावे? हा बदल का? लता खूप दिवसांनी घरी येत असूनही आणि लता अनेक कुटुंबातील महिलांची लाडकी असूनही तिचीसुद्धा कुणी चौकशी केली नाही तर तिच्याबद्दल काही बायकांच्या डोळ्यात स्पष्टपणे घृणा दिसत होती. ही किमया