प्रेम म्हणजे प्रेम असत- २

(23)
  • 25.1k
  • 1
  • 16.3k

प्रेम म्हणजे प्रेम असत- २ “आय नो जय, मला सगळ कळतंय.. तू अशी गम्मत नाही करणार....आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे..माझ तुझ्यावर प्रेमही आहे.. पण प्रेम वेगळ आणि लग्न वेगळ!!! तू असा निर्णय घेतलास कसा त्याच मला आश्यर्य वाटतंय... माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे पण... तू समजून का नाही घेत रे?” “शट अप ग रितू!!! सारख सारख पण काय? आता परत काय झाल रितू.. मी तुला कितीवेळा सांगितलय....माझ तुझ्यावर किती प्रेम आहे आणि माझ्यासाठी तू किती महत्वाची आहेस.. तरी तू परत परत तोच विषय का काढतेस? खर सांगू का.... आता मला कंटाळा आलाय तेच तेच सांगून! तुला माझ्याबरोबर संसार