नवनाथ महात्म्य भाग ८

  • 9.7k
  • 2
  • 4.5k

नवनाथ महात्म्य भाग ८ त्याच्या अशा बोलण्याने मच्छिंद्रनाथ चकित झाले . मग त्याने आपणास वीट मिळाल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील, ही मोठी मला धास्ती आहे, म्हणून बोलले . ते ऐकून गोरक्ष म्हणाला, अशाश्वत वित्त आता आपल्याजवळ नाही म्हणून भय देखील नाही ! हे ऐकून काहीतरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनात उद्भवली व त्यास तळमळ लागली. तेव्हा गोरक्षाने मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभयतांनी आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली. निघण्यापूर्वी झोळी तपासताना झोळींत वीट नाही असे पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलले त्यांनी एकच गोंधळ केला. दुःखाने ते गडबडा लोळू लागले व मोठमोठ्याने रडून पिशाच्चासारखे