भूक बळी भाग २

  • 7.2k
  • 3
  • 2.3k

संध्याकाळची रात्र झाली होती. मागच्या कित्येक दिवसांत क्वचितच स्टोव्ह पेटला होता. आता तर बाटलीतील रॉकेलही तळाला गेलं होत. कोणाकडून मागावं तर आजूबाजूची मंडळीही तिच्यापेक्षाही गरीब. त्यातही अर्धेअधिक गावी पळालेले. नाही म्हणायला तिच्या गल्लीच्या दुसऱ्या टोकावर राहणारा कोणीतरी अजून इथेच होता. त्यांची तशी फारशी ओळख नव्हती. केवळ सार्वजानिक शौचालयाचा मार्ग त्यांच्या दरवाजातून जायचा म्हणून केवळ तोंडदेखली ओळख. त्यातही तिच्या भरलेल्या अंगावरून फिरणारी नजर तिला नेहमीच बोचायची. लॉकडाऊन झाल्यानंतर त्याच कुटुंब तिला दिसलं नव्हतं, कदाचित गावी गेले असावे. तिला एकटीच पाहून त्याने बरेचदा लाळघोटेपणा करत तिची चौकशी केली होती. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट व्यक्त होणारे भाव वाचून तिने नेहमीच त्याला नकार दिला होता.