मन आनंद आनंद छायो

  • 6k
  • 1.8k

सकाळी उठल्यावर रेडिओवरचं ‘ मन आनंद आनंद छायो’ हे तंबोर्याच्या सुरावर म्हणलेलं आशाताईंचं गाणं कानावर पडलं आणि वसुचं मन एकदम प्रसन्न झालं. चला दिवसाची सुरवात तरी छान झाली असं म्हणत चहा पित पित ती टेबलवर थोडी रेंगाळली. नंतर मात्र प्रसन्न मनाने पण चटाचट हात उचलत तिने रोजची कामं आटोपली. सचिन, श्रेयाचे डबे भरले . आणि घाईघाईने ती चहा घेउन सासुबाईंच्या खोलीत आली. वरुण आईचे पाय चेपत बसला होता. तिला पाहताच किती उशीर? असा चेहरा करुन तो आॕफीसच्या तयारीसाठी उठला.सासुबाईंना झोप लागली होती. झोपेतला त्यांचा शांत चेहरा पाहून तिला हसु आलं. उठल्या उठल्या हा शांतपणा दिसेनासा होणार होता. जाग आली की