एक झूंज तिने जिंकलेली

(18)
  • 12.7k
  • 3.4k

देवयानी सकाळीच उठली. दररोजच्या सवयीप्रमाणे प्रात:विधी उरकून छान कोमट पाण्याने नाहून देवासमोर बसली. डोळे बंद करून संपूर्ण रामरक्षा स्तोत्र म्हटले. देवाला नमस्कार केला आणि पदर खोचून एखाद्या रणरागिणी प्रमाणे संसाराचा रथ हाकायला सज्ज झाली. आज तिला अगदीच अस्वस्थ वाटत होतं. चहाचं आदन ठेवलं खरं गॅसवर पण नेहमीप्रमाणे इलायचीही घातली नाही त्यात. एकटक शून्यात हरवून बघत होती. तीची ऐवढी घालमेल होण्याचं कारणही तसंच गंभीर होतं. आज ब्लाऊज घालताना तिला उजव्या बाजूला एक गाठ हाताला जाणवली होती आणि तीच गाठ तीला स्वस्थ बसू देत नव्हती. अगदी सकाळचा आवडता गोड चहाही तीला आज कडवट लागत होता. पण देवयानी एक गृहिणी होती आणि प्रत्येक