स्पर्श - भाग 9

(17)
  • 16.3k
  • 10.5k

कॉलेज असा एक कट्टा जिथे प्रत्येक विद्यार्थी भारावून जातो ..काहींच्या स्वप्नांना पंखांची गरज नसते तर काहींना पंखच लाभत नाहीत ..काहींना इतके मित्र मिळतात की त्यांच्यासोबत असताना वेळ केव्हा जाते कळत नाही तर काही त्या सर्वांना बघूनच दिवस काढतात ..असाच आमचा ग्रुप ..गेले 3 वर्ष आम्ही भरपूर मज्जा केली ..त्याला काहीच सीमा नव्हती पण आता जबाबदारीची जाणीव होऊ लागली आणि सर्वच सिरीयस झाले ..याला अपवाद म्हणजे शाश्वत आणि विकास ..त्यांनी आयुष्याला कधीच सिरीयस घेतलं नव्हतं मुळात त्यांना गरज वाटली नव्हती पण अभियांत्रिकीच हे शेवटचं वर्ष सर्वाना एक नवीन धडा शिकविणार होत ज्याचा कुणीच विचार केला नव्हता ..क्षण भरपूर